स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पर्दापण करताना आपण असा दावा करू शकतो का, की आपली लोकशाही सुरक्षित आहे?
कशामुळे आपल्या लोकशाहीची अशी अवस्था होऊन आपण एका अघोषित हुकूमशाही पर्वात पोहोचलो आहोत? एक गोष्ट तर स्पष्टपणे दिसत आहे की, देशाच्या अर्थव्यवस्थेवर देशी-विदेशी संपत्तीचा फास आवळला जात असून पाणी, जमीन वा जंगल यांची लूट वाढण्याचा लोकशाहीवरील हल्ल्याशी थेट संबंध आहे. त्यासाठी लोकशाही मजबूत करणाऱ्या संस्थांना – सर्वोच्च न्यायालय, रिझर्व्ह बँक, निवडणूक आयोग – कमजोर करण्याचा प्रयत्न केला जातो आहे.......